लाऊडस्पीकरवर आरती न वाजल्याने भाविकांमध्ये नाराजी
भोंगावादामुळे एलएडी स्क्रीनवर आरती पाहता येत असली तीचे स्वर भाविकांच्या कानी पडत नसल्याने भक्त गोंधळुन जातायत. आज सकाळी जेव्हा 5 वाजुन 15 मिनटांनी काकड आरती सुरू झाली तेव्हा भक्तांमध्ये निरव शांतता होती.
भोंगावादामुळे आज तिस-या दिवशी साई मंदिरातील पहाटेची काकड आरती आणि मशिदीवरील अजान लाऊडस्पीकर शिवाय झाली. गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच शिर्डीच्या साईमंदिरातील रात्रीची शेजारती तसेच पहाटची काकड आरती लाऊडस्पीकर शिवाय करण्यात येतं आहे. शिर्डी साईबाबा मंदिर हे जागतिक किर्तीचे देवस्थान आहे. देश विदेशातील लाखो भाविकांची साईबाबांवर श्रद्धा असुन पहाटच्या काकड आरतीत सामिल होता याव यासाठी भाविक रात्रीपासुनच दर्शनरांगेत उभे असतात.मंदिरात आरतीसाठी मर्यादा असल्याने अनेक भाविक द्वारकामाई समोर बसुन आरतीचा लाभ घेतात. भोंगावादामुळे एलएडी स्क्रीनवर आरती पाहता येत असली तीचे स्वर भाविकांच्या कानी पडत नसल्याने भक्त गोंधळुन जातायत. आज सकाळी जेव्हा 5 वाजुन 15 मिनटांनी काकड आरती सुरू झाली तेव्हा भक्तांमध्ये निरव शांतता होती. कोणालाही कळले नाही की आरती केव्हा सुरू झाली आणि केव्हा संपली.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!

