AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tamil Nadu | अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय, शेवटच्या क्षणीच मोठा...

Tamil Nadu | अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय, शेवटच्या क्षणीच मोठा…

| Updated on: May 05, 2026 | 12:43 PM
Share

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीची आणि थरारक लढत पाहायला मिळाली. डीएमकेचे ज्येष्ठ नेते आणि सहकार मंत्री के.आर. पीरियाकरुप्पन यांचा अवघ्या एका मताच्या फरकाने पराभव झाला आहे. टीव्हीकेचे उमेदवार सीनिवास सेथुपती यांनी 83,375 मते मिळवत विजय मिळवला, तर पीरियाकरुप्पन यांना 83,374 मते मिळाली. या मतमोजणीत शेवटच्या फेरीपर्यंत पीरियाकरुप्पन 30 मतांनी आघाडीवर होते.

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीची आणि थरारक लढत पाहायला मिळाली. डीएमकेचे ज्येष्ठ नेते आणि सहकार मंत्री के.आर. पीरियाकरुप्पन यांचा अवघ्या एका मताच्या फरकाने पराभव झाला आहे. टीव्हीकेचे उमेदवार सीनिवास सेथुपती यांनी 83,375 मते मिळवत विजय मिळवला, तर पीरियाकरुप्पन यांना 83,374 मते मिळाली. या मतमोजणीत शेवटच्या फेरीपर्यंत पीरियाकरुप्पन 30 मतांनी आघाडीवर होते. मात्र अंतिम फेरीत एका मताने चित्र पालटले आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निकालामुळे राज्यातील राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे.
दरम्यान, या मतदारसंघातील आर. पलकुरीची पंचायतमधील दोन हजारांहून अधिक मतदारांनी प्रशासकीय सीमा वाद न सुटल्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकला होता. या बहिष्काराचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाल्याचे मानले जात आहे. के.आर. पीरियाकरुप्पन हे डीएमकेचे अनुभवी आणि प्रभावी नेते मानले जातात. 2006 पासून ते सलग चार वेळा तिरुप्पत्तूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. 2021 मध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांना ग्रामविकास मंत्रीपद देण्यात आले होते, तर नंतर डिसेंबर 2022 मध्ये सहकार विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी यापूर्वी मनुष्यबळ आणि मंदिर प्रशासन मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.
या निकालामुळे तमिळनाडूतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

Published on: May 05, 2026 12:43 PM
Follow Us