AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monkeypox Virus | मंकीपॉक्सने घाबरून जाऊ नका, तो कोविड इतका घातक नाही, काय म्हणाले प्रदीप आवटे?

Monkeypox Virus | मंकीपॉक्सने घाबरून जाऊ नका, तो कोविड इतका घातक नाही, काय म्हणाले प्रदीप आवटे?

| Updated on: Jul 26, 2022 | 4:14 PM
Share

Monkeypox Virus | मंकीपॉक्स या नव्या आजाराने घाबरून जाऊ नका राज्यातच नाही तर देशभरात त्याच्या निदाना व्यवस्था असल्याचे राज्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी सांगितले.

Monkeypox Virus | साधारपणे जगभरातल्या 75 देशांमध्ये मंकीपॉक्स या रोगाची (Monkeypox Virus) 16 हजारांहून अधिक रुग्ण सध्या आढळले आहेत. नुकतचं जागतिक आरोग्य संघटनेने(World Health Organization) जागतिक आणीबाणी असल्याचं नुकतंच जाहीर केलं आहे. भारताचा विचार केला तर तीन रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. केरळ आणि दिल्लीत ही रुग्ण आढळून आले आहेत. मंकीपॉक्स या नव्या आजाराने घाबरून जाऊ नका राज्यातच नाही तर देशभरात त्याच्या निदानाची व्यवस्था असल्याचे राज्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे (Pradip Awate) यांनी सांगितले.

तसेच हा आजार कोविड-19 (Covid-19) सारखा गंभीर आणि जीवघेणा नाही. त्याच्या प्रसाराचा वेगही तितका नाही. तो वेगाने पसरत नाही. भीती नको, समजून घेऊ, आपण सर्व सुरक्षित राहू, अशी त्यासाठी टॅगलाईन केल्याचे त्यांनी सांगितले. देवीच्या आजारासारखाच सौम्य स्वरुपाचा हा विषाणू आहे. त्यामुळे घाबरुन न जाता काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.