Yasmin Wankhede | चांगल काम करणाऱ्यांना बदनाम करू नका, यासमिन वानखेडेंचं नवाब मलिक यांना उत्तर

जे चांगलं काम करत आहेत. त्यांना बदनाम करु नका, असंही यास्मिन वानखेडे म्हणाल्या. इतकंच नाही तर नवाब मलिक यांनी भविष्यात असे आरोप केले तर त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार, कायदेशीर नोटीस पाठवणार असा इशाराही त्यांनी दिलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई ड्रग्स प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केलीय. फ्लेचर पटेलसोबत फोटोत असलेली लेडी डॉन कोण आहे? या लेडी डॉनचा तुमच्याशी संबंध काय? तिचं बॉलिवूडशी काय कनेक्शन आहे? असे सवाल नवाब मलिक यांनी केले आहेत. मलिकांच्या या प्रश्नांना आता समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी उत्तर दिलंय.

कॅबिनेट मंत्री असं अनव्हेरिफाईट स्टेटमेंट देत आहेत. काही स्टेटमेंट देण्यापूर्वी त्यांनी विचार करावा. माझा भाऊ योग्य कारवाई करत आहे. मी मनसे चित्रपटच सेनेत उपाध्यक्ष आहे आणि कायदेशीर काम पाहते. माझ्या राजकीय स्टेटसचा आणि माझ्या कामाचा त्यांनी आदर करायला हवा. समाजाला ते चुकीची प्रेरणा देत आहेत, त्यांना हे समजायला हवं. पुरावे द्या आणि मग बोला, असं आव्हान यास्मिन वानखेडे यांनी नवाब मलिकांना दिलंय.

कुणाला बदनाम करण्याचं काम आम्ही करत नाही. आमचे नातेवाईक जर येत नसतील तर आमची चूक आहे का? जे कर्मठ आहेत. जे चांगलं काम करत आहेत. त्यांना बदनाम करु नका, असंही यास्मिन वानखेडे म्हणाल्या. इतकंच नाही तर नवाब मलिक यांनी भविष्यात असे आरोप केले तर त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार, कायदेशीर नोटीस पाठवणार असा इशाराही त्यांनी दिलाय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI