Draupadi Murmu | पहिल्या आदिवासी राष्ट्रपतींनी घेतली शपथ, सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्याकडून द्रौपदी मुर्मूंना गोपनीयतेची शपथ
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या मोठ्या फरकानं विजयी झाल्या. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या या निवडणुकीत त्यांनी युपीएचे उमेदवार यशवंत सिंह यांना पराभूत केले. वाचा..
नवी दिल्लीः आज भारतासाठी अभिमानाचा दिवस आहे. देशाचे 15 वे राष्ट्रपती (Indian President) म्हणून यांनी द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी आज संसद भवनात शपथ घेतली. सव्वा दहा वाजेच्या सुमारास देशाचे सर न्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ दिली. देशाच्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा इतिहास आज रचला गेला. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा ( N V Ramanna) यांच्याकडून द्रौपदी मुर्मू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली गेली. आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात पोहोचल्या. मावळते राष्ट्रपती रामनात कोविंद यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्रि परिषदेचे सदस्य आदी उपस्थित होते. द्रौपदी मुर्मू यांचे संपूर्ण कुटुंबदेखील या सोहळ्याला उपस्थित होते. त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या मोठ्या फरकानं विजयी झाल्या. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या या निवडणुकीत त्यांनी युपीएचे उमेदवार यशवंत सिंह यांना पराभूत केले.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

