Siddhivinayak Temple Video : मुंबईतील सिद्धिविनायकाला जाताय? आता असा ड्रेस कोड असेल तरच मिळणार बाप्पाचं दर्शन
भारतीय परंपरेला साजेसे कपडे भाविकांनी परिधान करावेत, असे आवाहन सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाकडून भाविकांना करण्यात आलं आहे. दरम्यान, सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईतील आणि मुंबईबाहेरील गणेश भक्तांसाठी एक मोठी बातमी आहे. मुंबईच्या प्रभादेवी परिसरातील सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाताना तुम्हाला आता ड्रेस कोडच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. कारण नुकतंच मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. भारतीय परंपरेला साजेसे कपडे भाविकांनी परिधान करावेत, असे आवाहन सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाकडून भाविकांना करण्यात आलं आहे. दरम्यान, सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती देताना सिद्धिविनायक मंदिर सदस्य राहुल लोंढे म्हणाले, पुढच्या आठवड्यापासून ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. काही भक्तांच्या तक्रारी , सूचना न्यासाकडे प्राप्त झाल्या होत्या. काही भाविकांचे पेहराव समोरच्याला संकोच वाटणारे असायचे, त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. तर सिद्धिविनायक मंदिरात येणारा भक्ताचा पेहराव हा पावित्र्य जपणारा असावा. जो पेहराव कराल तो दुसऱ्याला संकोच वाटणारा नसावा. त्यामुळे यापुढे समोरच्याला संकोच वाटेल असा पेहराव असेल त्यांना न्यासाकडून प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद भाविकांनी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

