रत्नागिरीत पावसाची दाणादाण; 6 नद्यांनी ओलांडली इशारा पातळी, चांदेराई बाजारपेठेत शिरलं पुराचं पाणी!
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रत्नागिरी, 27 जुलै 2023 | गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. रत्नागिरी मध्ये 6 नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चांदेराई बाजारपेठेत उडघ्याभर पुराचं पाणी शिरलं आहे. काजळी नदीचं पाणी या बाजारपेठेत शिरलं आहे.
Published on: Jul 27, 2023 10:44 AM
Latest Videos
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

