AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldhana | पाऊस नसल्याने शेतकऱ्याने फिरवला पिकावर ट्रॅक्टर

Buldhana | पाऊस नसल्याने शेतकऱ्याने फिरवला पिकावर ट्रॅक्टर

| Updated on: Jul 04, 2021 | 8:28 PM
Share

बुलडाणा जिल्ह्यात 60 टक्के पेरण्या झाल्या असून गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी मात्र चिंताग्रस्त झाले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात 60 टक्के पेरण्या झाल्या असून गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी मात्र चिंताग्रस्त झाले आहेत. जिल्ह्यात पेरणी केलेली पिके चांगली उगवली पण पावसाने दडी मारल्याने आता उगवलेली पिके सुकू लागली आहेत. जिल्ह्यातील बावनबीर येथील प्रशांत खोडे या हतबल झालेल्या शेतकऱ्याने आपल्या 10 एकर पेरणी झालेल्या सोयाबीन शेतावर ट्रॅक्टर फिरवला आणि संपूर्ण पीक नष्ट केलं आहे. प्रशांत यांनी आपली स्वतःची पाच एकर तसेच भाड्याने पाच एकर अशी 10 एकर शेतीत 10 दिवसांपूर्वी सोयाबीन पेरलं होतं. जमिनीत थोडी ओल असल्याने पेरणी केलेलं सोयाबीन उगवलं पण नंतर पाऊसच नसल्याने हे पीक कोमेजून नष्ट होत असल्याने प्रशांत यांनी हतबल होऊन पिकावर ट्रॅक्टर फिरवून नष्ट केलं आहे. यात प्रशांत या शेतकऱ्याच जवळपास एक लाखाचं नुकसान झालं आहे. आता दुबार पेरनीशिवाय अशा शेतकऱ्यांना पर्याय नाही. त्यामुळे त्यांना मदतीची अपेक्षा आहे. (Due to lack of rain, farmer destroyed the soybean crop in Buldana)