घराणेशाही जोपासणारे पक्ष लोकशाहीचे शत्रू; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
घराणेशाहीवाले पक्ष आणि सरकारे देशाचे दुश्मन आहेत. त्यांना संविधानाशी काहीही घेणं देणं नाही हे लोकांच्या लक्षात आलं आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी केली.
नवी दिल्ली: देशात सर्व प्रकारचं राजकारण सुरू आहे. एक राजकारण एखाद्या कुटुंबाच्या भक्तीचं आहे. तर दुसरं राजकारण देशभक्तीचं सुरू आहे. देशातील काही राजकीय पक्ष केवळ आपल्याच कुटुंबासाठी काम करत आहेत. भाजपने (bjp) घराणेशाहीविरोधात बोलायला सुरुवात केली आणि हाच निवडणुकीचा मुद्दा बनवला. घराणेशाहीवाले पक्ष आणि सरकारे देशाचे दुश्मन आहेत. त्यांना संविधानाशी काहीही घेणं देणं नाही हे लोकांच्या लक्षात आलं आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी केली. भाजपच्या 42व्या स्थापना दिवसानिमित्त ते व्हर्च्युअली कार्यकर्त्यांशी संबोधित करत होते. यावेळी त्यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून काँग्रेसला (congress) लक्ष केलं.

