BJP Foundation Day: 42 वर्षांचा झाला भाजपा, पंतप्रधान मोदी संबोधीत करणार, महाराष्ट्रासह देशभर पहिल्यांदाच शोभायात्रा

सोबतच 12 एप्रिलला पूर्ण देशात टीकाकरण दिवस साजरा केला जाणार आहे. 13 एप्रिलला गरीब कल्याण योजनांअंतर्गत कार्यक्रम चालणार आहे. 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. तीही मोठ्या धूमधडाक्यात साजरी केली जाणार आहे. त्यासंबंधीत कार्यक्रमाचही आयोजन केलं जाणार आहे.

BJP Foundation Day: 42 वर्षांचा झाला भाजपा, पंतप्रधान मोदी संबोधीत करणार, महाराष्ट्रासह देशभर पहिल्यांदाच शोभायात्रा
भाजपचा स्थापना दिन
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 1:30 PM

भारतीय जनता पार्टी (BJP) म्हणजेच भाजपाचा आज 42 वा स्थापना दिवस. (BJP Foundation Day) एका अर्थानं देशातल्याच नाही तर जगातल्या सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या राजकीय पक्षाचा वाढदिवस. आजच्याच दिवशी म्हणजे 6 एप्रिल 1980 ला भाजपाची स्थापना झालेली होती. सुरुवातीला जनसंघ म्हणून ओळख असलेला पक्ष नंतर भारतीय जनता पक्ष नावानं उदयाला आला. 1984 ला लोकसभेत अवघे दोन खासदार असलेला भाजपा आज दणदणीत बहुमत घेत सत्तेत आहे. तो फक्त सत्तेतच आहे असं नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वाखाली, विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्ष गलितगात्र झालेला दिसतोय. गेल्या 42 वर्षांचा भारतीय जनता पार्टीचा इतिहास म्हणूनच महत्वपूर्ण ठरतोय. त्याचाच ऊहापोह आजच्या दिवशी केला जातोय.

सकाळी 10 वा. मोदींचं संबोधन

भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस असेल आणि त्यादिवशी पंतप्रधान मोदी कार्यकर्त्यांना संबोधीत करणार नाहीत असं कसं होईल. बरं प्रत्येक कार्यक्रमात भाजपचा कार्यकर्ता किती महत्वाचा आहे हे ते आवर्जून सांगत असतात. त्यामुळेच आज सकाळी 10 वा. पंतप्रधान मोदी हे भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधीत करतील. भाजपची आतापर्यंतची वाटचाल आणि भविष्यातल्या वाटचालीवर ते बोलतील अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. फक्त मोदींचं संबोधनच नाही तर भाजपानं आज महाराष्ट्रासह देशपातळीवर ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजीत केलाय. तोही जिल्हा, विभाग, गाव पातळीपर्यंत ध्वजारोहण केलं जाणार आहे. पक्षाच्या स्थापना दिनी तो तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे.

पहिल्यांदाच शोभायात्रा निघणार

महाराष्ट्रात गुढीपाडव्याला शोभायात्रेची परंपरा आहे. हीच परंपरा भाजपानं स्थापनादिनी देशभरात पक्षासाठी राबवण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजेच भाजपच्या 42 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच शोभायात्रा निघणार आहे. ह्या शोभायात्रेत भाजपच्या टॉपच्या नेत्यांपासून ते गावपातळीवरच्या सामान्य नेत्यापर्यंत सर्वांनी सहभागी होणे अपेक्षीत आहे. तशा सुचना देण्यात आल्यात. त्यामुळेच ध्वजारोहणाबरोबरच शोभायात्रा यासुद्धा आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य असेल.

मोदींचं ट्विट वाचा

नड्डा विदेशी राजदुतांशी बोलणार

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे सुद्धा आज परदेशी राजदुतांशी बोलणार आहेत. हे सुद्धा पहिल्यांदाच घडतंय. ‘भाजपा को जानो’ नावाचा कार्यक्रमांचं राजधानी दिल्लीत आयोजन करण्यात आलंय. ह्या कार्यक्रमाला नड्डा संबोधीत करणार आहेत. तर पाहुणे म्हणून दिल्लीत असलेले विविध देशांच्या राजदुतांना निमंत्रीत केलं गेलंय. यात खासकरुन आशियायी देशांच्या राजदुतांचा समावेश आहे. कमीत कमी 13 राजदूत ह्या कार्यक्रमात सहभागी होतील अशी आशा आहे.

सामाजिक पंधरवाडा पाळणार

भाजपा स्थापना दिवसाची संधी साधत सामाजिक पंधरवाडाही पाळणार आहे. म्हणजेच मोदी सरकारच्या विविधी सामाजिक योजनांची माहिती गावपातळीपर्यंत देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 7 ते 20 एप्रिल दरम्यान त्यासाठी विविधी कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. सोबतच 12 एप्रिलला पूर्ण देशात टीकाकरण दिवस साजरा केला जाणार आहे. 13 एप्रिलला गरीब कल्याण योजनांअंतर्गत कार्यक्रम चालणार आहे. 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. तीही मोठ्या धूमधडाक्यात साजरी केली जाणार आहे. त्यासंबंधीत कार्यक्रमाचही आयोजन केलं जाणार आहे.

हे सुद्धा वाचा:

संजय राऊत इतके मोठे नाहीत की त्यांच्यावर भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी प्रतिक्रिया द्यावी – चंद्रकांत पाटील

Sanjay Raut : ‘कष्टातून मिळवलेली सगळी संपत्ती भाजपाला दान करायला तयार’

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.