Chhagan Bhujbal : ईडी म्हणजे नो जामीन, छगन भुजबळांनी सांगितला अनुभव

6 नोव्हेंबर 2021 ला देशमुख आर्थर जेलमध्ये गेलेत. 8 महिने 28 दिवसांपासून अजूनही त्यांना जामीन मिळालेला नाही. त्यानंतर ईडीनं आपला मोर्चा नवाब मलिक यांच्याकडं वळविला. मलिकही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना जामीन मिळालेला नाही.

गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Aug 03, 2022 | 8:58 PM

मुंबई : ईडी म्हणजे नो जामीन, असा अनुभव माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितला. भुजबळ मनी लाँड्रींग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड तुरुंगात होते. पत्राचळ घोटाळा प्रकरणी राऊतांव र मनी लाँड्रींगचे आरोप झालेत. 14 मार्च 2016 ते 4 मे 2018 पर्यंत भुजबळ जेलमध्ये होते. दोन वर्षे एक महिना 21 दिवसांनी त्यांना जामीन मंजूर झाला होता. मनी लाँड्रींग प्रकरणात माजी मंत्री अनिल देशमुखही आर्थर रोड जेलमध्ये आहेत. 6 नोव्हेंबर 2021 ला देशमुख आर्थर जेलमध्ये गेलेत. 8 महिने 28 दिवसांपासून अजूनही त्यांना जामीन मिळालेला नाही. त्यानंतर ईडीनं आपला मोर्चा नवाब मलिक यांच्याकडं वळविला. मलिकही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना जामीन मिळालेला नाही. 7 मार्च 2022 ला मलिक आर्थर रोड जेलमध्ये आले. ४ महिने 27 दिवसांपासून ते आर्थर रोड जेलमध्येच आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें