राऊत यांना ईडीचा झटका; निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या घरावर ईडीचा छापा
पाटकर यांच्याशी निगडीत 10 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. कोरोना काळात मुंबई बीएमसीअंतर्गत कोविड सेंटर्समध्ये कथीत घोटाळ्याप्रकऱणी त्यांच्यावर हे छापे टाकण्यात आले आहेत. तर पाटकर यांच्यावर लाईफलाईन कंपनीद्वारे कोरोना काळात कोविड सेंटर्सच्या नावाखाली भ्रष्टाचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुजित पाटकर यांना ईडीने झटका दिला आहे. तर पाटकर यांच्याशी निगडीत 10 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. कोरोना काळात मुंबई बीएमसीअंतर्गत कोविड सेंटर्समध्ये कथीत घोटाळ्याप्रकऱणी त्यांच्यावर हे छापे टाकण्यात आले आहेत. तर पाटकर यांच्यावर लाईफलाईन कंपनीद्वारे कोरोना काळात कोविड सेंटर्सच्या नावाखाली भ्रष्टाचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. तर त्यानी याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर आता ईडीने या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करून पाटकर यांच्यावर छापेमारी सुरू केली आहे. तर त्यांच्याशी निगडीत 10 ठिकाणी छापेमारी केली असून सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

