ईडी चौकशीने एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ, राजकीय पुनर्वसनातही अडथळा येणार? जाणकारांचं म्हणणं काय?

पुण्यातील भोसरी एमआयडीसीच्या भूखंड खरेदीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे खान्देशासह राज्याचे राजकारण सध्या ढवळून निघाले आहे.

जळगाव : जळगाव जिल्ह्यात राजकारणात गेली 40 वर्षे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजीमंत्री एकनाथ खडसे यांची पुण्यातील भोसरी एमआयडीसीच्या भूखंड खरेदीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे खान्देशासह राज्याचे राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. खडसेंची यापूर्वीदेखील याच प्रकरणात चौकशी झाली आहे. आता पुन्हा नव्याने होत असलेल्या चौकशीमुळे खडसेंच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या राजकीय पुनर्वसनात अडथळा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Eknath Khadse ED inquire know analytics from Maharashtra political expert)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI