Shivsena | ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास, कारण आलं समोर
राज्याच्या राजकारणात सध्या नव्या चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय दीना पाटील यांचा एकाच गाडीतून प्रवास झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात जाऊन संजय दीना पाटील यांच्या पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला.
राज्याच्या राजकारणात सध्या नव्या चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय दीना पाटील यांचा एकाच गाडीतून प्रवास झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात जाऊन संजय दीना पाटील यांच्या पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला. तसेच उद्धव ठाकरे यांनीही संजय दीना पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत प्रकृतीची चौकशी केली. शिवाय मिलिंद नार्वेकर यांनीही रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
दरम्यान, शिंदे आणि संजय दीना पाटील यांचा एकाच गाडीतून प्रवास झाल्याचे समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना अधिकच जोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू असून, त्याच पार्श्वभूमीवर या घडामोडींकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
या भेटीमागे केवळ शिष्टाचार आहे की राजकीय हालचालींचा भाग, याबाबत स्पष्टता नसली तरी राज्यातील राजकारणात या घटनेची जोरदार चर्चा रंगत आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “हा प्रसंग मानवी भावनेतून घडलेला आहे. संजय दीना पाटील यांच्या पत्नीच्या अपघातानंतर त्यांना मदत करण्यासाठीच ते शिंदे यांच्या गाडीत बसले होते. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही,” असे सामंत यांनी स्पष्ट केले. तसेच, “एकनाथ शिंदे हे संवेदनशील नेतृत्व आहे. अशा प्रसंगी ते नेहमीच मदतीला धावून येतात. त्यामुळे या घटनेचा राजकीय अर्थ लावण्याची गरज नाही,” असेही त्यांनी नमूद केले. या सर्व घटनांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असले, तरी यामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास....
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने..
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत...

