AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष

Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष

| Updated on: Jun 09, 2026 | 4:13 PM
Share

शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी नुकत्याच केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा बच्चू कडू यांनी व्यक्त केली होती

शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी नुकत्याच केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा बच्चू कडू यांनी व्यक्त केली होती. विदर्भातील दौऱ्यांदरम्यान लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा करत त्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसैनिकांनी आता शांत बसून चालणार नाही, असंही म्हटलं.

बच्चू कडू यांनी 4 दिवसांत विदर्भात 20 सभा घेतल्याचं सांगत, विदर्भ एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहू इच्छित असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच एकनाथ शिंदे यांना जितकं डावललं जाईल तितके ते लोकांच्या मनात अधिक मजबूत होतील, असंही ते म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीनंतर नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना बच्चू कडू यांच्या विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर हसत हसत प्रतिक्रिया देताना, “बच्चू कडू नेमकं काय म्हणाले हे आधी जाणून घेतो, मग बोलेन,” असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या सूचक प्रतिक्रियेमुळे आणि मौन मग हास्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Published on: Jun 09, 2026 04:13 PM

Follow Us