Mahayuti Oath Ceremony : महायुती सरकारचा शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता…
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिनही नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील घडामोडींना ही वेग आल्याचे पाहायला मिळाले.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदान येथे महायुती सरकारच्या भव्य शपथविधीचा सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिनही नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील घडामोडींना ही वेग आल्याचे पाहायला मिळाले. महायुती सरकारचा शपथविधी पार पडताच आणि नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या देखील बदलल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतील मंत्रालयात सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचं दालन आहे. तिथे एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणूनची पाटी बदलून त्याजागी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी लावण्यात आली. तर देवेंद्र फडणवीस यांची पाटी असलेल्या उपमुख्यमंत्रीपदाच्या दालनाबाहेर एकनाथ शिंदे यांची पाटी लावण्यात आली. दरम्यान, महायुती सरकार पुन्हा एकदा आल्याने आणि अजित पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्री झाल्याने त्यांच्या दालनाबाहेरील पाटीमध्ये कोणताच बदल करण्यात आला नाही.