एकनाथ शिंदे-राज ठाकरे भेटीनंतर शिंदे सेनेकडून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर शिंदे सेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. शितल म्हात्रे, उदय सामंत आणि नरेश मस्के यांनी विविध माध्यमातून उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. आदित्य ठाकरे यांनी मात्र यावर थेट प्रतिक्रिया देणे टाळले, परंतु एकनाथ शिंदे यांच्या प्रवृत्तीशी मतभेद असल्याचे म्हटले. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. या भेटीनंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. शितल म्हात्रे यांनी “माझा भाऊ पळवला” असे ट्विट करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला, तर मंत्री उदय सामंत यांनी “मैत्री अशी ठेवा की अनेकांचा जळफळाट झाला पाहिजे” असे स्टेटस ठेवून निशाणा साधला.
याचबरोबर खासदार नरेश मस्के यांनीही उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. राज ठाकरेंनी शिंदे साहेबांना भेटल्याबद्दल टीका करणाऱ्यांना उद्देशून, “तुम्ही महाराष्ट्रातील जनतेशी लाचारी केलेली आहे, शिवसेनेच्या विचारांशी गद्दारी केलेली आहे,” असे मस्के म्हणाले. दुसरीकडे, आदित्य ठाकरे यांनी थेट प्रतिक्रिया टाळत, एकनाथ शिंदे यांच्या प्रवृत्तीविरुद्ध आमचे टोकाचे भांडण असल्याचे म्हटले. त्यांनी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला.
Published on: Feb 20, 2026 10:23 AM
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
