Shivsena : त्यांचे आका दिल्लीत… केविलवाणे चेहरे अन् इंडिया आघाडीच्या बैठकीत ठाकरेंना 6 व्या रांगेत स्थान… शिंदे सेनेची जहरी टीका
'जेव्हापासून मविआची स्थापना झाली तेव्हापासून उबाठा पक्षाचं हेडक्वार्टर दिल्लीत झालंय. ज्या उद्धव ठाकरेंना शिवसेना-भाजप युतीमध्ये इतका मानसन्मान होता. त्यांच्या आदेशाने चालायचं. त्यांची खुर्ची मध्यस्थानी असायची. पण त्यांना दिल्लीत जाऊन पाचव्या-सहाव्या रांगेत बसावं लागतंय'
गुरुवारी दिल्लीत राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीत झालेल्या घोटाळ्यासंदर्भात एक प्रेझेंटेशन दिलं. या प्रेझेंटेशनमधून राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप केला. त्यानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांची राहुल गांधी यांच्या घरी एक बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे उपस्थित होते. मात्र दिल्लीत उद्धव ठाकरे यांना इंडिया आघाडीच्या बैठकीत सहाव्या रांगेत बसवण्यात आलं असा दावा आता केला जातोय. याबाबतचे काही व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. यावरूनच एकनाथ शिंदे यांची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. ‘साहेब यांना माफ करा, सडका मेंदू साफ करा’ अशा घोषणा देत आज दादर शिवाजी पार्क येथील दिवंगत हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर शिवसैनिकांनी आंदोलन केलं.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

