‘पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस खड्ड्यात टाकली’, शिंदे गटाच्या नेत्याचा थेट हल्लाबोल
VIDEO | एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार संजय शिरसाट यांची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सडकून टीका, 'सगळ्यात मोठा -हास कुणी केला असेल तर तो पृथ्वीराज चव्हाण यांनी...'
छत्रपती संभाजीनगर, 26 ऑगस्ट 2023 | शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आलं आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. शरद पवार यांचा अजित पवार यांना छुपा पाठिंबा आहे असे म्हटले तर पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस खड्ड्यात टाकली असल्याचे म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, मागच्या सरकारमध्ये जे काही मुख्यमंत्री होते त्यांनी आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यापैकी एक म्हणजे पृथ्वीराज चव्हाण…शरद पवार पृथ्वीराज चव्हाण यांना एकदा बोलले होते की, या पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाताला लकवा मारलाय का? त्यांच्याकडून कोणतीही सही केली जात नाही. असा माणूस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतो आणि म्हणतात तुम्ही ठाण्याचे मुख्यमंत्री आहात? मुख्यमंत्री असताना तुम्ही कोणत्याच मतदार संघात गेले नाहीत आणि सगळ्यात मोठा -हास कुणी केला असेल, काँग्रेस कुणी खड्ड्यात टाकली असेल तर ती पृथ्वीराज चव्हाण यांनी टाकली असल्याचा घणाघात शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे अशा लोकांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करू नये, असे म्हणत थेट इशारा दिला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

