Eknath Shinde | Swapnil Lonkar च्या कुटुंबीयांना Shivsena 10 लाखांची मदत देणार : एकनाथ शिंदे

आज शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचा धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर स्वप्नीलच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून 10 लाख रुपये मदत दिल्याची माहितीही माहितीही त्यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर महाविकास आघाडी सरकारवर सर्व स्तरातून जोरदार टीका होऊ लागली. अखेर सरकारनं आता एमपीएससी बाबत महत्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. त्यानंतर आज शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचा धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर स्वप्नीलच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून 10 लाख रुपये मदत दिल्याची माहितीही माहितीही त्यांनी यावेळी दिली. स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI