शपथविधीच्या 3 तासांआधी सस्पेन्स, अखेर एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा शपथ घेण्याचा दुसरा नंबर होता. त्यामुळे गेल्या सरकारमध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्रिपदाचा भूमिकेत आलेत.
एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली पण शपथ घेण्याच्या तीन तासांपर्यंत सस्पेन्स कायम होता. अखेर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा शपथ घेण्याचा दुसरा नंबर होता. त्यामुळे गेल्या सरकारमध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्रिपदाचा भूमिकेत आलेत. विशेष म्हणजे ही शपथ घेण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे स्मरण करत यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या पाठिंब्याचा उल्लेख केला आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यपालांनी त्यांना पुष्पगुच्छ देत एकनाथ शिंदेंचं स्वागत केलं. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना नमस्कार केला. यावेळी मोदींनी शिंदेंच्या हातावर थाप मारली आणि दोघेही खळखळून हसले. संपूर्ण शपथविधी सोहळा भाजपमय होता. मंचावर राज्यातील आणि केंद्रातील बडे नेते उपस्थित होते. अजित पवारांच्या पक्षाचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही होते मात्र शिंदेंच्या शिवसेनेचा एकही नेता मंचावर नव्हता तर मंचावर बसतानाही एकनाथ शिंदे एकटे आणि दादा आणि फडणवीस एकत्र बसल्याचे पाहायला मिळाले.