Maharashtra DCM Swearing-in : लाल पागोटं, गुलाबी शेला अन् अजितदादांनी रेकॉर्डच केला; 6 व्यांदा उपमुख्यमंत्री

Maharashtra DCM Swearing-in : लाल पागोटं, गुलाबी शेला अन् अजितदादांनी रेकॉर्डच केला; 6 व्यांदा उपमुख्यमंत्री

| Updated on: Dec 06, 2024 | 11:52 AM

यंदा लाल पागोटं आणि गुलाबी शेल्याने कॅम्पेन करणाऱ्या अजित दादांनी आपलाच रेकॉर्ड मोडल्याने त्यांच्या नावाची चर्चा आहे. एक दोन नव्हे तर तब्बल सहावेळा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

देशाच्या राजकारणात चार मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात सहाव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे अजित पवार हे पहिले नेते ठरलेत. आपलाच जुना रेकॉर्ड मोडून त्यांनी काल उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत नवा रेकॉर्ड केलाय. यंदा लाल पागोटं आणि गुलाबी शेल्याने कॅम्पेन करणाऱ्या अजित दादांनी आपलाच रेकॉर्ड मोडल्याने त्यांच्या नावाची चर्चा आहे. एक दोन नव्हे तर तब्बल सहावेळा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उराशी मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न बाळगून असले तरी कदाचिक अजित दादांचा उपमुख्यमंत्रिपदाचा रेकॉर्ड पुढची अनेक दशकं कोणीच मोडणार नाही. सरकार कोणाचंही येवो अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून आधीच फिक्स आहेत, असा समज व्हावा इतकं अजित पवारांचं नातं उपमुख्यमंत्रिपदाशी जोडलं गेलं आहे. आतापर्यंत चार मुख्यमंत्र्यांच्या समवेत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हा सुद्धा अनोखा विक्रम आहे. २०१० साली अजित पवारांनी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २०१२ पुन्हा उपमुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडली तेव्हाही पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. २०१९ च्या २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर असे फक्त ८० तास उपमुख्यमंत्री राहण्याचा रेकॉर्डही दादांनी पहाटेच्या शपथविधीवेळी केला. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. लगेच सात दिवसांनी ३० नोव्हेंबर २०१९ दादा मविआत उपमुख्यमंत्री झालेत. उद्धव ठाकरे त्यावेळी मुख्यमंत्री होते. जून २०२३ ला मविआला सोडून ते महायुतीत उपमुख्यमंत्री झाले त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि आता २०२४ ला सहाव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत.

Published on: Dec 06, 2024 11:52 AM