Maharashtra DCM Swearing-in : दादा सहाव्यांदा उपमुख्यमंत्री, गुलाबी जॅकेट अन् वेगळ्या पद्धतीने अजित पवारांनी घेतली शपथ
Maharashtra DCM ajit pawar Swearing-in Ceremony : राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मात्र आज अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतली. आज गुरुवारी महायुती सरकारमधील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मात्र आज अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतली. आज गुरुवारी महायुती सरकारमधील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचवेळी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा विक्रम केला. यावेळी त्यांनी गुलाबी रंगाचं जॅकेट परिधान केल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ वेगळ्या पद्धतीने घेतल्याचे पाहायला मिळाले. ‘मीअजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की…’, असे म्हणत अजित पवारांनी आपल्या शपथविधीला सुरूवात केली. शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार असलेले 22 राज्यांचे मुख्यमंत्री हजर होते.