ShivSena : एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे एकत्र यावेत, चंद्रकांत रघुवंशी यांचे मत
नंदुरबार जिल्ह्याचे शिवसेनेचे 99 टक्के पदाधिकारी शिंदेसोबत असल्याचं त्यांनी सांगितलं. धुळ्यातीलही काही पदाधिकारी आमच्यासोबत असल्याचं ते म्हणाले. शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र व्हावेत, अशी इच्छा रघुवंशी यांनी व्यक्त केली.
मुंबई : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, याची वाट पाहतोय, असं मत चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केलंय. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याचे शिवसैनिक एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आहेत, असं ते म्हणाले. जिल्ह्याचा विकास हवा असेल, तर सत्ता आवश्यक आहे. त्यामुळं हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. हजार बाराशे पदाधिकारी आलेले आहेत. तालुकाप्रमुख, सरपंच, महानगर प्रमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, दोन नगरपालिकेचे नगराध्यक्ष, दोन पंचायत समितीची सभापती तसेच इतर पदाधिकारी आहेत. साखरी नगरपंचायतीचे पाचही नगरसेवक, नंदुरबार जिल्ह्याचे शिवसेनेचे 99 टक्के पदाधिकारी शिंदेसोबत असल्याचं त्यांनी सांगितलं. धुळ्यातीलही काही पदाधिकारी आमच्यासोबत असल्याचं ते म्हणाले. शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र व्हावेत, अशी इच्छा रघुवंशी यांनी व्यक्त केली.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द

