AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DCM Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग, चर्चांना उधाण!

DCM Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग, चर्चांना उधाण!

| Updated on: Jun 08, 2026 | 11:39 AM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते राजधानीत दाखल झाले असून, पुढील दोन दिवस ते दिल्लीतच मुक्कामी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत संघटनात्मक विषयांसह आगामी राजकीय घडामोडींवर चर्चा होणार आहे. याशिवाय 10 जून रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) संयुक्त बैठकीलाही एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्ली दौऱ्यादरम्यान शिंदे हे शिवसेनेच्या खासदारांशी स्वतंत्र चर्चा करणार असल्याचेही सांगितले जात आहे. तसेच काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर केंद्रीय नेतृत्वासोबतही त्यांची चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदारदेखील शिंदे यांची दिल्लीत भेट घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

यापूर्वीही गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर पुन्हा झालेल्या या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, शिंदे यांच्या या दौऱ्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा सक्रिय झाल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. ठाकरे गटातील काही नेत्यांच्या संभाव्य हालचालींबाबत तर्क-वितर्क लावले जात असून, आगामी काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 08, 2026 11:39 AM

Follow Us