Special Report | शिंदे गटातील नाराजी महागात पडणार?

शिंदेंकडे शिवसेनेचेच 40 आमदार आहेत. अपक्ष आमदारांची संख्याही 10 आहे. इच्छुकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळं पहिल्या टप्प्यात संधी न मिळाल्यानं, अपक्ष आमदार बच्चू कडूंसह यड्रावकर आणि संजय शिरसाट नाराज असल्याचं दिसतंय.

Special Report | शिंदे गटातील नाराजी महागात पडणार?
| Updated on: Aug 09, 2022 | 9:56 PM

मुंबई : अखेर 39 दिवसांनंतर शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला…भाजपकडून 9 आणि शिंदे गटाकडून 9 असे एकूण 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe Patil), सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar), चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil), गिरीश महाजन(Girish Mahajan), सुरेश खाडे(Suresh Khade), मंगलप्रभात लोढा(Mangalprabhat Lodha), रविंद्र चव्हाण(Ravindra Chavan), विजयकुमार गावित(Vijaykumar Gavit), अतुल सावे(Atul Save) मंत्री झालेत. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील(Gulabrao Patil), शंभूराज देसाई(Shambhuraj Desai), दादा भूसे(Dada Bhuse), अब्दुल सत्तार( Abdul Sattar), दीपक केसरकर(Deepak Kesarkar), संदीपान भुमरे( Sandipan Bhumre), तानाजी सावंत(Tanaji Sawant), संजय राठोड(Sanjay Rathod ) आणि उदय सामंत(Uday Samant ) मंत्री झालेत.

मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात एकाही महिलेला भाजप, शिंदे गटाकडून महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातूनच तिघांना कॅबिनेट मंत्री करण्यात आलंय. औरंगाबाद जिल्ह्यातून शिंदे गटाकडून संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार तर भाजपकडून अतुल सावेंना मंत्री करण्यात आले. भाजप आणि शिंदे गटासोबत असलेल्या अपक्षांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही.
टीईटी घोटाळ्यात मुलांची नावं आल्यानंतरही सत्तारांना मंत्री करण्यात आलंय. तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात मंत्रिपद गमावलेल्या संजय राठोडांना मंत्री करण्यात आलं. भाजपमध्ये इनकमिंग झालेल्या राधाकृष्ण विखे पाटलांना, विजय कुमार गावितांना मंत्रिपद देण्यात आलं.\ शिवसेनेच्या 16 अपात्र आमदारांच्या यादीतील उदय सावंत, अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे मंत्री झालेत. भाजप आणि शिंदे गटाकडून ज्येष्ठ आमदारांनाच संधी देण्यात आली.

विस्तारात भाजप आणि शिंदे गटानं ज्यांना मंत्री केलं, त्यात इनकमिंग झालेल्या नेत्यांचाही समावेश आहे. त्यावरुनही सुप्रिया सुळेंनी टोला लगावलाय. तर मंत्रिमंडळ विस्तारावरुन राष्ट्रवादीनं शिंदे-फडणवीसांचा फोटो लावून. ईडी सरकारचे शपथ घेतलेले मंत्री म्हणत ट्विटवर पोस्ट करुन भाजपला डिवचलंय. राधाकृष्ण विखे पाटील, भाजपला गँग ऑफ वासेपूर ही उपमा देणारे हे महोदय आता भाजपमध्येच विसावलेत.

तानाजी सावंत, महाराष्ट्राला भिकारी बनवेन पण मी भिकारी बनणार नाही ही यांची भूमिका. अब्दुल सत्तार, टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावं असल्याचा आरोप. मंगलप्रभात लोढा, यांच्यावर खंडणी आणि फसवणुकीचे कथित आरोप. सुरेश खाडे मिरजेला दंगल नवीन नाही अशी प्रक्षोभक भाषा करुन सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न. संदीपान भुमरे, कथित जमीन घोटाळ्यात न्यायालयाने यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन घेण्याचे आदेश दिले होते. उदय सामंत यांची पदवी बोगस असल्याचा आरोप आहे. रवींद्र चव्हाण, वरिष्ठ नेत्याचे गुणगान करण्याच्या नादात दलित बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.

 

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.