Shiv Sena : राज्यात लवकरच सत्तांतर, राऊतांचा दावा; त्यांना स्वप्न रंगवू द्या, एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर
महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर झालं तर वावगं वाटण्याचं कारण नाही, असा दावाही राऊत यांनी केलाय. राऊतांच्या या दाव्यावर एकनाथ शिंदे यांनी खोचक टोला लगावलाय.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंडोबा केला आहे. या गटानं फुटून महाराष्ट्राला काय दिलं. त्यांना दुसऱ्या पक्षाचा आसरा घ्यावा लागेल. आमदार आमच्या संपर्कात आहेत. महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर झालं तर वावगं वाटण्याचं कारण नाही, असा दावाही राऊत यांनी केलाय. राऊतांच्या या दाव्यावर एकनाथ शिंदे यांनी खोचक टोला लगावलाय. ‘त्यांना स्वप्नात राहू द्या, ते स्वप्न पाहत असतात. त्यांना स्वप्न पाहू द्या. राज्यात 166 आमदारांचं सरकार आहे. लोकसभेतही 12 आमदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे. राज्यात आणि केंद्रातही पक्षाकडे बहुमत आहे. सरकार पूर्णपणे मजबूत आहे. त्यामुळे त्यांना स्वप्न पाहू द्या’, असं प्रत्युत्तर शिंदे यांनी राऊतांना दिलंय.
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...

