Sambhajinagar : पोरगं दारू पितं, आम्ही आईची परडी मागून जगतोय.., व्हायरल झालेल्या आजी-आजोबाशी खास बातचीत
Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमधील एका वृद्ध दाम्पत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. त्या वृद्ध दाम्पत्याशी टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीने साधलेला हा खास संवाद.
एका वृद्ध दाम्पत्याचा छत्रपती संभाजीनगरमधील दगिन्यांच्या दुकानातला व्हीडीओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. मण्याची पोत आणि डोरलं खरेदीसाठी गेलेल्या या वृद्ध दाम्पत्याची परिस्थिती बघून दुकानदाराने त्यांना डोरलं आणि एक मण्याची पोत भेट म्हणून दिल्याचं या व्हिडीओमध्ये दिसलं. आजी-आजोबांचं या वयात देखील एकमेकांना आधार देणं, प्रेमाने वागवणं आणि दुकानदाराची माणुसकी यामुळे नेटकऱ्यांनी या व्हीडीओला चांगलचं उचलून धरलं. या संपूर्ण घटनेवर आता खुद्द या वृद्ध दाम्पत्याशी टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीने संवाद साधला आहे.
यावेळी बोलताना या वृद्ध दाम्पत्याचा साधेपणा बघून सगळेच हरखून गेले. जालना जिल्ह्यातलं हे वृद्ध जोडपं सध्या छत्रपती संभाजीनगरच्या गजानन मंदिर परिसरात रहातं आणि लोकांना आईची परडी मागून आपला उदरनिर्वाह करतं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मात्र दोघे फारच संकोचले असल्याचे दिसले. मुलीचं लग्न झालंय, मुलगा दारू पितो, त्रास देतो म्हणून हे दाम्पत्य घर सोडून आलंय. दारोदारी जाऊन आईची परडी मागून त्यातून जे काही मिळेल त्यावर हे वृद्ध आजी आजोबा आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांनी त्यांच्याशी साधलेला हा खास संवाद..
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

