शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 2017 च्या वॉर्डरचनेप्रमाणेच निवडणुका होणार

महापालिका निवडणुकीत (Election 2022) नवी वॉर्डर रचना तयार करण्यात आली होती. ती वॉर्ड रचना रद्द केल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. तसेच 2017 मध्ये ज्या वॉर्डरचनेप्रमाणे निवडणुका झाल्या होत्या. त्याच वॉर्ड रचनेप्रमाणे यंदाही निवडणूक घेण्याचा सरकारचा विचार असल्याचे समजते. या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्यास हा महाविकास आघाडीसाठी आणखी एक मोठा धक्का ठरु शकतो.

वनिता कांबळे

|

Aug 03, 2022 | 5:57 PM

मुंबई : राज्यातील नव्या शिंदे-फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 2017 च्या वॉर्डरचनेप्रमाणेच निवडणुका होणार आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (Cm Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत महापालिका निवडणुकीत (Election 2022) नवी वॉर्डर रचना तयार करण्यात आली होती. ती वॉर्ड रचना रद्द केल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. तसेच 2017 मध्ये ज्या वॉर्डरचनेप्रमाणे निवडणुका झाल्या होत्या. त्याच वॉर्ड रचनेप्रमाणे यंदाही निवडणूक घेण्याचा सरकारचा विचार असल्याचे समजते. या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्यास हा महाविकास आघाडीसाठी आणखी एक मोठा धक्का ठरु शकतो.

येणाऱ्या निवडणुकीत वॉर्ड रचनेवरती प्रभाव पडणारे आणखी एक मोठा फॅक्टर आहेत, त्यातला एक फॅक्टर म्हणजे आरक्षण आहे, ठरणार आहे कारण अलीकडेच आरक्षणाची समीकरणे ही बदललेली आहेत. त्याचा विचार करूनही नवी वॉर्ड रचना हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे. ओबीसी आरक्षणावरही अनेक मोठे निर्णय झालेले आहेत. त्यांचाही विचार आगामी काळात वॉर्ड रचना बदलताना करण्यात येईल.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें