Breaking | ऊर्जामंत्री नितीन राऊतांकडून पदाचा गैरवापर, कुणाल राऊतांनी भाजपचे आरोप फेटाळले
युवक काँग्रेसच्या निवडणुकीत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडून महावितरणच्या यंत्रणेचा वापर केला जात आहे. या निवडणुकीत त्यांचा मुलगा उभा असल्याने राऊत यांनी महावितरणच्या यंत्रणेचा बेकायदेशीरपणे वापर सुरू केला आहे, असा आरोप भाजपच्या युवा मोर्चाने केला आहे.
युवक काँग्रेसच्या निवडणुकीत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडून महावितरणच्या यंत्रणेचा वापर केला जात आहे. या निवडणुकीत त्यांचा मुलगा उभा असल्याने राऊत यांनी महावितरणच्या यंत्रणेचा बेकायदेशीरपणे वापर सुरू केला आहे, असा आरोप भाजपच्या युवा मोर्चाने केला आहे. या प्रकरणी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही भारतीय जनता युवा मोर्चाने केली आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. राज्याच्या ऊर्जामंत्र्यांचे चिरंजीव कुणाल हे लढवत असलेल्या प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडणुकीसाठी महावितरणची यंत्रणा वापरली जात आहे. तसे सिद्ध झाल्याने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

