जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा, यशोमती ठाकूर यांची मागणी
नाशिक भोंदूबाबा प्रकरणात ज्या राजकीय लोकांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. त्या सर्वांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
नाशिक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. यावर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. रुपाली चाकणकर यांनी खरे तर आधीच राजीनामा द्यायला हवा होता.परंतू देर आए, दुरुस्त आए असे ठाकूर यांनी म्हटले आहे. राज्यात अंधश्रद्धा निर्मुलन आणि जादूटोणा विरोधी कायदा असूनही अशा घटना घडत आहे. या कायद्याची अंमलबजावणी का होत नाही. हिंदू धर्माच्या मतांवर निवडून येणाऱ्या हिंदू धर्माला बदनाम करणारा हा प्रकार कसा चालतो. या प्रकरणात जे कोणी सहभागी आहेत. त्या सर्वांनी राजीनामा द्यायला हवा. चित्रा वाघ म्हणत आहे की आम्ही कारवाई केली म्हणून प्रकरण उघड झाले. चित्रा ताईंनी हे लक्षात घ्यायला ती तक्रारदार महिला ठाम राहिली म्हणून हे सर्व उघड झाले आहे. भाजपा राम रहिमला जामीन देते, आसारामचे फोटो मुंबई आणि पुण्यात लागलेले असतात. हे कसे काय चालते. चंद्रकांत पाटील यांचे फोटो पुढे आले आहेत. त्यांचे फोटो व्हायरल व्हायला हवेत अशी मागणी ठाकूर यांनी केली. खरात यांच्या संस्थेला पाणी देणाऱ्या महाविकास आघाडीतील पाणी मंत्र्यावर देखील कारवाई व्हायला हवी अशीही मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
Published on: Mar 21, 2026 12:24 PM
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन

