EP 05 : Bas Evdhach Swapna | ज्येष्ठ नागरिकांच्या बजेटकडून अपेक्षा

प्रत्येकाला अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारमण यांच्याकडून खूपच अपेक्षा आहेत, अशातच ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा येणाऱ्या अर्थसंकल्पापासून खूप सार्‍या अपेक्षा आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Jan 28, 2022 | 3:31 PM

ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये जे अर्थसंकल्प सादर केले जाणार आहे त्या अर्थसंकल्पातून खूपच अपेक्षा आहेत. अर्थसंकल्प (Budget 2022) येण्यासाठी आता आठवड्यातील काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. प्रत्येकाला अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारमण यांच्याकडून खूपच अपेक्षा आहेत, अशातच ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा येणाऱ्या अर्थसंकल्पापासून खूप सार्‍या अपेक्षा आहेत. व्याजदर कमी झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) खूप सार्‍या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ज्येष्ठ नागरिक त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी फिक्स्ड इनकम मध्ये गुंतवणूक करतात. बँक फिक्स्ड डिपॉजिट्स अधिकतर ज्येष्ठ नागरिकांची पहिली पसंती असते. या फिक्स डिपॉझिट वर सध्याच्या काळामध्ये 6 टक्के पेक्षा कमी व्याजदर मिळत आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पातून या फिक्स डिपॉझिट रक्कमेवर असणाऱ्या व्याजदरात(Interest Rate) वाढ व्हावी ,अशी ज्येष्ठ नागरिकांना माफक अपेक्षा आहे. याशिवाय एन्युटी इनकमला टॅक्स फ्री केले जावे. सध्या या इनकमवर टॅक्स लावला जात आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें