मोठी खळबळ! अभिजीत दीपके यांच्या विरोधात थेट पोलिसांत FIR, तातडीने अटकेची मागणी
देशाच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर दिल्लीत फैजान अन्सारी यांनी CJP संस्थापक अभिजीत दीपके यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दीपके यांच्या सहकाऱ्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप अन्सारी यांनी केला आहे. या प्रकरणी दीपके यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मिळाेल्या माहितीनुसार, अन्सारी यांनी सांगितले की, “मी अभिजीत दीपके यांच्या विरोधात दिल्ली पोलीस उपायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. अभिजीत दीपके यांच्या सहकाऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्याचा पुरावा देखील माझ्याकडे आहे. त्यामुळे त्याला तातडीने अटक व्हावी अशी देखील मागणी केली आहे.”
तसेच पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही आपल्यावर हल्ले झाल्याचे त्यांनी सांगितले. या घटनांशी संबंधित दोन गुन्हे पोलिसांत दाखल असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे अन्सारी यांनी कौतुक केले. “मी दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि पोलिसांना सॅल्यूट करतो. त्यांनी दिल्लीतील वातावरण बिघडू दिले नाही,” असे ते म्हणाले. अभिजीत दीपके हे स्वतःच्या हितासाठी सर्व करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Published on: Aug 04, 2026 11:31 AM
मोठी खळबळ! अभिजीत दीपके यांच्या विरोधात थेट पोलिसांत FIR, तातडीने...
राम मंदिरावर बोलले... पण सिद्धिविनायकवर प्रश्न येताच राऊतांनी उत्तर...
भाजपची लोकप्रियता घरसत आहे, सहाच महिन्यात 40 हजारांहून अधिक मतदार....
TV9 मराठीच्या बातमीची दखल! दोन बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग