Rahul Shewale | अनिल परबांवर चुकीचे आरोप, ते निर्दोषत्व सिद्ध करतील : राहुल शेवाळे

परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत, असे म्हणत परब त्यांचं निर्दोषत्व सिद्ध करतील असा विश्वास खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला आहे.

जन आशीर्वाद यात्रा संपताच ईडीची नोटीस आली हा काही योगायोग नाही. हा ठरवून केलेला प्लान आहे, असा दावा शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. शेवाळे म्हणाले की, जन आशीर्वाद यात्रा संपल्यानंतर नोटीस आलेली आहे. त्यामुळे हा योगायोग नाही. या बरोबर प्लानिंग करून केलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे लोकांना पण कळून चुकले की ED चा वापर आता केंद्र सरकार राजकारणासाठी करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकच त्याचे प्रत्युत्तर देतील. तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरील आरोप चुकीचे आहेत, असे म्हणत परब त्यांचं निर्दोषत्व सिद्ध करतील असा विश्वास शेवाळे यांनी व्यक्त केला आहे. (False allegations against Anil Parab, he will prove his innocence : Rahul Shewale)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI