VIDEO : Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 4 PM | 15 July 2021

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील 13 राज्यांमध्ये अव्वल मुख्यमंत्री ठरले आहेत. प्रश्नम या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील 13 राज्यांमध्ये अव्वल मुख्यमंत्री ठरले आहेत. प्रश्नम या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी याच मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. “भाजप नेते उत्तर प्रदेशचं कौतुक करत असतात, पण या सर्वेक्षणात यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  यांचा पाचवा नंबर आहे, हे भाजपने विसरु नये” असा टोला रोहित पवारांनी लगावला. रोहित पवारांनी ट्विट करुन उद्धव ठाकरेंचं अभिनंदन तर केलंच, शिवाय भाजपवरही निशाणा साधला.