Satish Bhosle Video : हरिणाच्या मटणासाठी जबर मारहाण… बीडमध्ये धसांचा कार्यकर्ता ‘खोक्या’ची दहशत; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड आणि त्याची गँग जेलमध्ये असली तरी खोक्यासारखे माजोरडे अजूनही उघडपणे दहशत माजवताहेत. धसांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले उर्फ खोक्यानं ढाकणे नावाच्या बाप लेकाला मारहाण केली. हरिणाला पकडण्यासाठी शेतात जाळ का लावला? असा सवाल केल्याने खोक्यानं बेदम मारहाण केली आहे.
पैशाचा माज असलेला सुरेश धसांचा कार्यकर्ता खोक्या भाई उर्फ सतीश भोसले असं त्याचं नाव.. पैशाची बंडल फेकणं आणि नोटा उडवण्याचा भलताच शौक या खोक्याला आहे. पण याचा कारनामा एवढ्यावरच थांबला नाही. तर बॅटने आणि रॉडने मारहाण आणि दहशत निर्माण करणं असा वाल्मिक कराडच्या गँगसारखाच शौक या खोक्या उर्फ सतीश भोसलेला आहे. हरिणाला पकडण्यात अडथळा आणला म्हणून बीडच्या शिरूर तालुक्यात ढाकणे पिता पुत्रांना एवढं बेदम मारल की मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला. तर वडिलांचे दात तुटले. हरिणाचं मटण खाण्याचा शौकीन असल्याचा खोक्यावर आरोप आहे. ढाकणेच्या शेतात हरिण पकडण्यासाठी खोक्यान जाळं लावलं. पण जाळं का लावलं काढून टाका म्हणताच खोक्यानं दिलीप ढाकणेंना मारलं. दांड्याने वार तोंडावर बसल्यामुळे दिलीप ढाकणे यांचे दात पडले आणि जबडाही फ्रॅक्चर झाला. तर वडिलांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या त्यांचा मुलगा महेश ढाकणे याचाही पाय फ्रॅक्चर होईपर्यंत त्याला मारलं. ढाकणेंच्या सांगण्याप्रमाणे खोक्याने दोन जाळी लावली होती ज्या जाळ्यामध्ये हरिण अडकलं ते मारून खोक्याने नेल्याचं महेश ढाकळे यांनी सांगितलं. खोक्या उर्फ सतीश भोसले हरिणाची शिकार करीत असेल तर किती गंभीर गुन्हा आहे हे वेगळं सांगायची गरज नाही पण कायद्याची भीतीच बीड जिल्ह्यामध्ये शिल्लक नसल्याचं खोक्याच्या दहशतीमधून दिसतं.

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?

एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका

विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
