VIDEO : Assembly Session | कालीचरण बाबावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नाना पटोले, मलिकांची सभागृहात मागणी

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही कालीचरण महाराजांवर टीका केली आहे. तसेच कालीचरण बाबावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी नाना पटोले, नवाब मलिक यांनी सभागृहात मागणी केली. बापू हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, असं ट्विट करत नवाब मलिक यांनी कालीचरण महाराजांवर निशाणा साधला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 27, 2021 | 1:51 PM

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही कालीचरण महाराजांवर टीका केली आहे. तसेच कालीचरण बाबावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी नाना पटोले, नवाब मलिक यांनी सभागृहात मागणी केली. बापू हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, असं ट्विट करत नवाब मलिक यांनी कालीचरण महाराजांवर निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. सत्य, अहिंसेला असत्य आणि हिंसक कधीही पराभूत करू शकत नाहीत. बापू हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, असं खोचक ट्विट मलिक यांनी केलं आहे. मलिक यांनी ट्विटसोबत एक व्हिडीओही शेअर केला आहे. हा व्हिडीओ महंत राम सुंदर यांचा असल्याचं सांगितलं जात आहे. कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरल्यानंतर त्यावर महंत राम सुंदर टीका करत आहेत

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें