AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WAVES 2025: ‘मिस्टर इंडिया 2’ चित्रपटाबद्दल शेखर कपूर यांचा मोठा दावा, ChatGPT चा उल्लेख करत म्हणाले....

WAVES 2025: ‘मिस्टर इंडिया 2’ चित्रपटाबद्दल शेखर कपूर यांचा मोठा दावा, ChatGPT चा उल्लेख करत म्हणाले….

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: May 01, 2025 | 6:26 PM
Share

मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (वेव्हज) मध्ये, बॉलिवूडचे ज्येष्ठ चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी टीव्ही 9 चे सीईओ आणि एमडी बरुण दास यांच्याशी Storytelling in the age of AI या विषयावर संवाद साधला.

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES 2025) सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 1 मे रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ बॉलिवूड चित्रपट निर्माते शेखर कपूर उपस्थित होते. या दरम्यान, त्यांनी टीव्ही 9 चे सीईओ आणि एमडी बरुण दास यांच्याशी ‘Storytelling in the age of AI’ या विषयावर खुलेपणाने संवाद साधला. या कार्यक्रमात शाहरुख खान, आमिर खान, अनिल कपूर, रजनीकांत, रणबीर कपूर यांच्यासह दाक्षिणात्य ते बॉलिवूडपर्यंत अनेक स्टार्सनी आपली उपस्थिती दर्शविली. यादरम्यान, निर्माता शेखर कपूर यांनी एक मोठा दावा केल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, ‘मिस्टर इंडिया 2’ या चित्रपटाची पटकथा घेऊन अनेक लोक माझ्याकडे आले होते. पण त्यांच्या कूकने चांगली पटकथा लिहिली होती. यासंदर्भात कूकला विचारले असताना जेव्हा त्याने चॅटजीपीटी वापरून स्क्रिप्ट लिहिली असल्याचे सांगितल्याचे त्यांनी जाहीरपणे यावेळी म्हटले.

Published on: May 01, 2025 06:26 PM

Follow Us