Pahalgam : हल्ल्याचा मास्टरप्लान असणारं टुलकिट समोर अन् दहशतवाद्यांच्या डेड ड्रॉप पॉलिसीचे ‘हे’ 4 कोड असतात महत्त्वाचे
पहलगाम हल्ल्याच्या संपूर्ण कटाची माहिती असणारे टूलकिट समोर आलं असून या टूलकिटमधून दहशतवाद्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, या टूलकिटची NIA कडून चौकशी सुरू आहे.
पहलगाम हल्ल्याच्या संपूर्ण कटाची माहिती असणारं टुलकिट आढळलं असून हल्ल्यासंदर्भात सापडलेल्या टुलकिटची एनआयकडून चौकशी सुरू आहे. टुलकिटमध्ये प्रवासाचा मार्ग आणि राहण्याच्या ठिकाणी माहिती होती. इतकंच नाहीतर सुरक्षा एजन्सींपासून कसा बचाव करावा, याची देखील रणनिती या टुलकिटमध्ये होती. टेलिग्रामवरील द रेझिस्टन्स टाईम्स ग्रृपमध्ये हे टुलकिट आढळून आलंय. यामध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठीची डेड ड्रॉप पॉलिसी समोर आली असून यासोबतच डेड ड्रॉप पॉलिसीचे चार कोड देखील उघड झाले आहे.
बिजी म्हणजे काही कारणास्तव वस्तू सोडता येत नाही
खतरा म्हणजे शस्त्र ठेवलेल्या जागेजवळ येऊ नका किंवा उचलू नका, याचा अर्थ असा की तुम्ही सुरक्षा एजन्सीच्या रडारवर आहात
ड्राप म्हणजे शस्त्रे यशस्वीरित्या ठेवण्यात आली आहेत.
पिक्डअप म्हणजे साहित्य व्यवस्थित उचलले गेलं आहे
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

