Pahalgam : हल्ल्याचा अख्खा प्लानचं उघड, दहशतवाद्यांना काय होत्या सूचना? अन्… टुलकिटमधून संपूर्ण कटाची माहिती समोर
पहलगाम हल्ल्यासंदर्भात सापडलेल्या टूलकिटची आता NIAकडून चौकशी सुरू आहे. टूलकिटमध्ये प्रवासाचा मार्ग आणि राहण्याच्या ठिकाणाची माहिती सुद्धा आहे. सुरक्षा एजन्सीपासून बचाव करण्याची रणनीती सुद्धा या टूलकिटमध्ये असल्याची माहिती आहे. टेलिग्रामवरील द रेसिस्टन्स टाइम्स या ग्रुपमध्ये हे टूलकिट आढळले आहे.
पहलगाम हल्ल्याच्या संपूर्ण कटाची माहिती असणारे टूलकिट आढळले आहे. टूलकिटमधून दहशतवाद्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. यामध्ये असं म्हटलं होतं, प्रवासावेळी इस्लामिक पोशाख घालण टाळा, सामान्य पर्यटकासारखे असावे. तुमचा ड्रेस कोड तुमच्या वयानुसार असायला हवा. भारतात ज्या शहरात जात आहात, तिथे कसे पोशाख असतात तसे कपडे घाला. तुमच्यासोबत कोणतेही इस्लामिक साहित्य किंवा धार्मिक वस्तू ठेवू नका. उदाहरणार्थ… कुराण, मिस्वाक, तस्बी, किब्ला घड्याळ, जनामाज इत्यादी. इस्लामिक परफ्यूम ऐवजी सामान्य परफ्यूमचा वापर करा. तुमचं घड्याळ उजव्या हातात घालणं टाळा. सुन्नतनुसार अंगठी घालू नका आणि इस्लामिक लुक करू नका. सामान्य हेअर स्टाईल ठेवा. जरी ती गैर इस्लामी वाटत असली तरीही.
चाकू किंवा पिस्तूल ठेवू नका, अगदी गरज असेल तर ते दुसऱ्या कुणाकडे तरी ठेवा. जेणेकरून अचानक शोध घेतल्यास तुमच्यावर संशय येऊ नये. तुम्ही जिथे जाणार आहात त्या ठिकाणाची माहिती आधीच घ्या. प्रवासादरम्यान दुसऱ्यांना धार्मिक सल्ला कुणाला देऊ नका. वाद घालणं किंवा भांडण टाळा, लोकांचे किंवा पोलिसांचे लक्ष तुमच्यावर जाऊ शकतं. तिकीट स्वतः खरेदी करा आणि इच्छुक स्थळी पोहोचल्यानंतर ते नष्ट करा. प्रवासादरम्यान आजूबाजूच्या लोकांवर लक्ष ठेवा आणि त्यांचे चेहरे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणी तुमचा पाठलाग करत आहे का ते तपासा, सामान्य प्रवाशांप्रमाणे रिलेक्स रहा. शक्य असल्यास तुमच्या इच्छुक स्थळी जाण्याआधी उतरा, त्यामुळे कोणी पाठलाग करत आहे की नाही हे समजेल, असा सूचना अतिरेक्यांना होत्या.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

