Pahalgam : हल्ल्याआधी बैसरन व्हॅलीत तळ ठोकला अन् ‘या’ तीन ठिकाणांची दहशतवाद्यांकडून रेकी, NIA च्या तपासात धक्कादायक माहिती उघड
जम्मू-काश्मीर येथील पहलागमच्या बैसरन व्हॅली येथे दहशतवादी हल्ला करण्यापूर्वी दहशतवादी हे दोन दिवस बैसरन व्हॅली येथेच तळ ठोकून होते, अशी माहिती एनआयएच्या तपासातून समोर आली आहे. यासह आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे बैसरन व्हॅलीसह बेताब व्हॅली, अम्युजमेंट पार्कची रेकी दहशतवाद्यांनी केली होती.
जम्मू-काश्मीर येथील पहलागमच्या बैसरन व्हॅली येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. यामध्ये एकूण २७ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर एनआयएकडून कसून कसून तपास सुरू कऱण्यात आला आहे. अशातच एनआयएच्या तपासातून पुन्हा एक नवी माहिती उघड झाली आहे. दहशतवाद्यांकडून तीन ठिकाणांची रेकी करण्यात आली होती. यामध्ये पहलगाम हेच ठिकाण दहशतवाद्यांचं लक्ष्य असून बेताब व्हॅली, अम्युजमेंट पार्कची रेकी अतिरेक्यांकडून करण्यात आली होती. दरम्यान, रेकी केल्यानंतर दहशतवाद्यांकडून बैसरनमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. तर बैसरन व्हॅली येथे हल्ला केल्यानंतर दहशतवादी जंगलाच्या दिशेने फरार झालेत. तर हल्ल्यानंतर पळून जाण्यास सोयीस्कर ठरणारे बैसरन व्हॅली हे ठिकाण निवडण्यात आल्याची माहिती मिळतेय. सहापैकी तीन दहशतवाद्यांनी हल्ला करण्यापूर्वी दोन दिवस ही रेकी केली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

