VIDEO : Dombivli | डोंबिवली स्थानकाजवळील लक्ष्मी निवास इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु

डोंबिवली रेल्वे स्टेशन जवळील लक्ष्मी निवास इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. लक्ष्मी निवास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक गोदाम आहे. या गोदामात ही आग लागली.

डोंबिवली रेल्वे स्टेशन जवळील लक्ष्मी निवास इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. लक्ष्मी निवास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक गोदाम आहे. या गोदामात ही आग लागली. या आगीचा धूर परिसरात दूरपर्यंत पसरला आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. या आगीमागील नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तसेच आगीत काही जिवितहानी झालेली आहे का याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण आगीमुळे संपूर्ण गोदाम जळून खाक झालं आहे.