Aurangabad Vaccination | औरंगाबादेत लसीकरणाला नंबर लावण्यासाठी भन्नाट आयडिया, थेट चप्पल रांगेत

औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा लसीकरणासाठी (Aurangabad vaccination) गर्दी झाल्याचं चित्र आहे. मात्र आज औरंगाबादकरांनी रांग लावण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. सोशल डिस्टन्समध्ये प्रत्यक्ष उभं राहण्याऐवजी, रांगेत चप्पल ठेवण्यात आली.

औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा लसीकरणासाठी (Aurangabad vaccination) गर्दी झाल्याचं चित्र आहे. मात्र आज औरंगाबादकरांनी रांग लावण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. सोशल डिस्टन्समध्ये प्रत्यक्ष उभं राहण्याऐवजी, रांगेत चप्पल ठेवण्यात आली. आपला नंबर आल्यानंतर चपलाजवळ येऊन ती पुढे सरकवायची असा प्रकार करण्यात येत आहे. चपला रांगेत आणि संबंधित व्यक्ती सावलीत, असं चित्र आज औरंगाबादेत पाहायला मिळालं. (Chappals in queue for corona vaccine at Aurangabad Maharashtra)

राज्यात जसा लसींचा तुटवडा जाणवत आहे, तसाच औरंगाबादमध्येही आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर मोठमोठ्या रांगा लागत आहेत. काल तर औरंगाबादेतील लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरीची परिस्थिती होती. अनेकजण पहाटेपासून रांगा लावत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI