Satish Bhosles Video : ‘खोक्या’चा गेम ओव्हर, सतीश भोसलेच्या घरावर वनविभागाचा बुलडोझर
खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घरावर वनविभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. वनविभागाच्या जमीनीवर असलेलं त्याचं घर वनविभागाकडून पाडण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून खोक्या उर्फ सतीश भोसले हा चांगलाच चर्चेत आला आहे. शिरूरमध्ये ढाकणे कुटुंबातील वडील आणि मुलाला खोक्या उर्फ सतीश भोसलेने बेदम मारहाण केली होती. दरम्यान ही मारहाण केल्यापासून खोक्या फरार होता. त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अखेर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून खोक्याच्या मुसक्या अवळल्या होत्या. त्यानंतर त्याला विमानाने मुंबईत आणण्यात येणार असून बायरोड बीडमध्ये नेण्यात येणार आहे. तर काही दिवसांपूर्वी वनविभागाकडून खोक्याच्या घराची तपासणी करण्यात आली होती, यावेळी वनविभागाला खोक्याच्या घरातून जनावरांचं सुखलेलं मांस आणि शिकारीसाठी लागणारं साहित्य सापडलं होतं. ते त्यांनी ताब्यात घेतलं होतं. तर ज्या ठिकाणी खोक्याने घरं उभारलं होतं ते वनविभागाच्या जागेवर उभारलं असल्याची माहिती समोर आल्यानंतर वनविभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. वनविभागाकडून खोक्याच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. खोक्याचं घर पाडण्यात आलं आहे. यापूर्वीच त्याला नोटीस देखील देण्यात आली होती. त्यानंतर आता वनविभागाकडून खोक्याच्या घरावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.