राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर काय म्हणाले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण?
VIDEO | राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर माजी मुख्यमंत्री म्हणाले, न्यायास विलंब हा न्याय नाकारणे...
नांदेड : राज्यातील सत्तासंघर्षावर आठ महिन्यानंतरही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला नाही. आता या प्रकरणावर येत्या मंगळवारी म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 10. 30 वाजता ही सुनावणी होणार आहे. यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाष्य केले आहे. न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागतो हे ठीक आहे, मात्र विलंब होऊ नये. तसेच वारंवार सुनावणी पुढे ढकलल्या जात असल्याने उशिराने दिलेला न्याय हा न्याय नाकारण्यासारखे होऊ नये, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर दिली आहे. सात घटनापीठाच्या खंडपीठासमोर हे प्रकरण न्यायचे का? याबाबत दोन्ही बाजूकडे भूमिका मांडण्यात आली आहे. आता यावर सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय घेईल, असेही अशोक चव्हाण म्हणाले आहे.
वांद्रे पूर्वेत रेल्वेची धडक कारवाई सुरूच; दुसऱ्या दिवशीही झोपड्यांवर
मोठी बातमी! पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकले; वनराज आंदेकर हत्या....
राजकारणात मोठी खळबळ! ठाकरेंचे तीन खासदार शिंदेंच्या नेत्यांच्या...
परभणीत भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
