काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार संजय जगतापांचा भाजपात प्रवेश
हवेलीचे माजी काँग्रेस आमदार संजय जगताप यांनी आज भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला.
हवेलीचे माजी काँग्रेस आमदार संजय जगताप यांनी आज सासवड येथे भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. सासवड आणि जेजुरीतील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी जगताप यांची भेट घेऊन भाजपमध्ये जाण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. जगताप यांच्या या पक्षांतरामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, पक्षप्रवेशानंतर बोलताना जगताप म्हणाले की, पक्षप्रवेशाला वेळ झाला आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहायला उशीर झाला त्यासाठी दिलगीरी व्यक्त करतो, माझ्या स्वभावात दोष आहे मी कायम उशीरा पोहोचतो त्यासाठी यावेळी जगताप यांनी दिलगिरी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व आणि भाजपची साथ आपल्याला लाभली आहे, असंही यावेळी संजय जगताप यांनी म्हटलं आहे.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

