Asif Shaikh Video : मालेगाव निवडणुकीसाठी बाहेरून पैसा आला? ‘सरकारला भक्कम पुरावे देणार आणि…’, माजी आमदाराचा खळबळजनक दावा
मालेगाव विधानसभा निवडणुकीत वोट जिहाद झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर आता मालेगावातील एका माजी आमदाराने खळबळजनक दावा केल्याचे समोर आले आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये वोट जिहाद झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला असल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर मालेगावातील एका माजी आमदाराने खळबळजनक दावा केला आहे. माजी आमदार आसिफ शेख यांनी विधानसभा निवडणुकीसाठी बाहेरून पैसा आल्याचे म्हणत एकच खळबळ उडवून दिली. माजी आमदार आसिफ शेख यांनी केलेल्या दाव्यानंतर मालेगावमधील निवडणुकीत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) या पक्षाच्या झालेल्या विजयावरच आता सवाल केले जात आहे. ‘विधानसभा निवडणुकीच्या वेळी मालेगावात बाहेरून पैसा आला’, असा दावा माजी आमदार आसिफ शेख यांनी केला. इतकंच नाहीतर आसिफ शेख हे सरकारला भक्कम पुरावे देणार असल्याचेही त्यांनी म्हटलंय. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना यासर्व गोष्टींची माहिती देणार असल्याचे आसिफ शेख म्हणाले. तर राष्ट्रीय तपास यंत्रणांसमोर याविषयीचे पुरावे दाखल करण्याची तयारी सुद्धा त्यांनी दर्शवली.

कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती

कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
