स्वतःची टिमकी वाजवणे म्हणजे…, पुण्यातील भाजपच्या अंतर्गत कुरघोडीवर गौरव बापट यांनी सुनावले खडेबोल
लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघात भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी विजय मिळवला. या निवडणुकीमध्ये मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे आमदार रविंद्रं धंगेकर याचा दारूण पराभव केला होता. मात्र पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचं श्रेय घेण्यासाठी अंतर्गत कुरघोडी असल्याचं सध्या दिसतंय
मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचं श्रेय घेण्यावरून पुणे भाजपमध्ये कुरघोडी सुरू आहे. पुण्यातील भाजपच्या एका बॅनरवरून दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे सुपुत्र गौरव बापट यांनी खडेबोल सुनावले आहेत. स्वतःची टिमकी वाजवून घेणे म्हणजे कार्यकर्त्यांचा अपमान करणे, अशी फेसबूक पोस्ट करत गौरव बापट यांनी नेत्यांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघात भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी विजय मिळवला. या निवडणुकीमध्ये मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे आमदार रविंद्रं धंगेकर याचा दारूण पराभव केला होता. मात्र पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचं श्रेय घेण्यासाठी अंतर्गत कुरघोडी असल्याचं सध्या दिसत आहे. अशातच गौरव बापट यांच्या पोस्टची जोरदार चर्चा होऊ लागली असून त्यांचा नेमका कोणावर रोख आहे? अशी पोस्ट का केली? याबाबत टीव्ही9 मराठीला आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

