Mumbai | भांडूपमधील मनपा रुग्णालयातील 4 बालकांचं मृत्यू प्रकरण; शिवसेना नेत्या आणि पालकांमध्ये वाद

अद्यापही पालिका प्रशासनाला नेमकं इन्फेक्शन कशामुळे झालं याचा शोध घेता आला नाही. त्यामुळे या रुग्णालयात नेमकं काय झालं? ज्यामुळे बालकांचा मृत्यू झाला असा सवाल उपस्थित होतोय. ही घटना गंभीर असून यासंदर्भात संबंधित दोषी व्यक्तींविरोधात भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे खासदार मनोज कोटक यांनी सांगितले आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Dec 23, 2021 | 7:56 PM

मुंबई : महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहामध्ये एन आयसीयू युनिटमध्ये उपचार घेत असलेल्या चार बालकांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. गेल्या चार दिवसात चार बालकांचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे . कुठल्यातरी इन्फेक्शनमुळे या मुलांचा मृत्यू झाला असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून त्यांच्या पालकांना कळविण्यात आलं, मात्र नेमके कारण अजूनही पालिकेला कळाले नाही, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. अद्यापही पालिका प्रशासनाला नेमकं इन्फेक्शन कशामुळे झालं याचा शोध घेता आला नाही. त्यामुळे या रुग्णालयात नेमकं काय झालं? ज्यामुळे बालकांचा मृत्यू झाला असा सवाल उपस्थित होतोय. ही घटना गंभीर असून यासंदर्भात संबंधित दोषी व्यक्तींविरोधात भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे खासदार मनोज कोटक यांनी सांगितले आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे भाजपकडून पालिकेविरोधत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी पुन्हा पेंग्विनचा उल्लेख करत भाजपने शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें