Pune DCP Case | फुकट बिर्यानी प्रकरण, ‘ती’ ऑडिओ क्लिप माझी नाही : पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे
पुण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याचं फोनवरील संभाषण चांगलंच व्हायरल होत आहे. पुण्यातील डीसीपी मॅडमला एसपी हॉटेलची बिर्याणी हवी आहे, तीही मोफत! डीसीपी मॅडमची ही फर्माईश आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय.
पुण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याचं फोनवरील संभाषण चांगलंच व्हायरल होत आहे. पुण्यातील डीसीपी मॅडमला एसपी हॉटेलची बिर्याणी हवी आहे, तीही मोफत! डीसीपी मॅडमची ही फर्माईश आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. डीसीपी मॅडमच्या या कारभाराला वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी थेट पोलीस महासंचालकांनाच पत्र लिहिलं आहे. दरम्यान, आम्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीत. मात्र, आता ही व्हायरल ऑडीओ क्लिप माझी नसल्याचे पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी म्हटलं आहे.
जवळपास 5 मिनिटाची ही ऑडिओ क्लिप आहे. त्यात डीसीपी मॅडम मटण बिर्याणी, प्रॉन्स आणि अजून एका नॉन व्हेज भाजीची ऑर्डर द्यायला आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहेत. त्यांना हे सगळं एका चांगल्या हॉटेलमधून हवं आहे. हे पदार्थ जास्त तेलकट, तिखटही नको आहेत. त्याचबरोबर त्याची चव चांगली असावी असाही त्यांचा हट्ट आहे. या डीसीपी मॅडम फक्त ऑर्डर देऊन थांबल्या नाहीत. तर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा सवालही केलाय. तो कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याचं सांगतोय. अशावेळी मॅडम महोदय त्या कर्मचाऱ्याला सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी बजावत असल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच

